बालगृहात दाखल कु. ऋतुजा वैरागे हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर,दि.19 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. ऋतुजा बाबुराव वैरागे (जन्म दिनांक 1 सप्टेंबर, 2009 14 वर्षे 11 महिने) हिला 18 जानेवारी, 2024 रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची 144 सें.मी. व ती शरीराने सडपातळ आहे.
तिच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे (मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment