उंबडगा येथे 16 डिसेंबर रोजी कुक्कुट पालन, शेळीपालन प्रशिक्षण

 

उंबडगा येथे 16 डिसेंबर रोजी कुक्कुट पालन, शेळीपालन प्रशिक्षण  

लातूर,दि.12:-  शेतकरी, पशुपालक, सुशिक्षित युवा, महिला बचतगट व पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्यांसाठी मुरुड कुक्कुट प्रशिक्षण केंद्र आणि औसा तालुक्यातील उंबडगा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उंबडगा येथे 16 डिसेंबर 2024 रोजी कुक्कुट पालन, शेळीपालन याबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणाचा उपयोग शेतीसोबत जोडधंदा व सुशिक्षित लोकांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी होणार आहे. विविध महामंडळातील पशुसंवर्धन विषयक योजना, बँकेतील कर्ज प्रकरणे व केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषद यांच्या विविध योजनेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्यास इच्छूकांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यानी मुरुड येथील कुक्कूट प्रशिक्षण केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेशसिंह बायस (मो. क्र. 8888150027), पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुरुड येथील कुक्कूट प्रशिक्षण केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेशसिंह बायस व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा