अनूसूचित जाती व अनूसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
अनूसूचित जाती व अनूसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
*लातूर, दि.3 (जिमाका):* अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक योजना सन 2024-25 अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी जिल्हयातील शेतकरी बांधवानी जास्तीत जास्त अर्ज करुन लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक, तसेच बहुभूधारक क्षेत्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकरी बांधवासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक योजना सन 2024-25 अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक (2 हे. पर्यंत क्षेत्र) शेतकऱ्यांना 80 टक्के तर बिरसा मुंडा कृषि क्रांती स्वावलंबी योजना, डॉ. बाबासाहेब कृषि स्वालंबन योजने अंतर्गत 10 टक्के असे एकूण 90 टक्के तर बहू भूधारक (2 हे. पेक्षा जास्त क्षेत्र) यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 75 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान असणारी लाभदायी योजना आहे.
ठिबक व तुषार घटकामुळे उत्पादनात व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आर्थिकस्तर उंचावण्यात मदत होते. तसेच पाण्याचा काटेकोर वापर झाल्याने तणांची वाढ रोखण्यास मदत होते आणि सिंचन क्षेत्रात वाढ होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment