गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर मिळणार गटई स्टॉल

 गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर मिळणार गटई स्टॉल


३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


लातूर, दि. १७ : अनुसूचित जातीमधील गटई काम करणाऱ्या कामगारांना सन २०२४-२५ या  आर्थिक वर्षामध्ये १०० टक्के अनुदानावर गटई स्टॉल देण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तींनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.


या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि अनुसूचित जातीमधील असावा. अर्जदाराचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपये व शहरी भागासाठी ५० हजार रुपयेपर्यंत असावे. अर्जदाराने सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गटई स्टॉल लावण्याच्या जागेचा आठ अ उतारा अथवा विहित नमुन्यातील भाडे करारनामा असणे आवश्यक आहे. 


या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी डालडा फॅक्टरी, गुळ मार्केट, लातूर येथे सादर करावेत. अनुसूचित जातीमधील जास्तीत जास्त गटई कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चिकुर्ते यांनी केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा