13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रम
सुधारित
13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रम
लातूर,दि.11: ध्वजदिन निधी संकलनचा शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली 13 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, विधवा व शौर्य पदकधारक यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.
**
Comments
Post a Comment