‘ग्रेपनेट’ प्रणालीवर लातूर जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याचे आवाहन
‘ग्रेपनेट’ प्रणालीवर लातूर
जिल्ह्यातील
निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याचे
आवाहन
लातूर, दि. 9 (जिमाका): लातूर जिल्ह्यामध्ये
2024-2025 या हंगामात निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. युरोपियन
व इतर देशांमध्ये लातूर पटट्यातून दरवर्षी द्राक्ष निर्यात होत असतात अपेडाच्या सहकार्यालयाने
ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करता येणार आहे.
द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी,
तपासणी, कीड व रोगमुक्त हमी, ॲगमार्क प्रमाणीकरण, फायटोसानिटरी प्रमाणीकरण या सर्व
बाबींची ग्रेपनेट प्रणालीद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात
2023-2024 मध्ये 150 निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली होती. सन 2024-2025
वर्षामध्ये फळे व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी कृषि विभागामार्फत खास उपक्रम
राबतवण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कृषीमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन
करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.
निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध
करुन देण्यासाठी लातूर जिल्ह्याला या वर्षी 300 द्राक्ष बागांची नोंदणी लक्षांक देण्यात
आले आहे. यासाठीच निर्यातक्षम द्राक्ष बागांची ‘अपेडा’च्या ग्रेपनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीवर
1 ऑक्टोबर 2024 पासून मोफत नोंदणी सुरु झाली आहे. त्यानुसार अधिकाधिक द्राक्ष व आंबा
बागायतदार शेतकऱ्यांनी बागांची नोंद करावी.
जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक यांच्याकडे नोंदणी अर्ज,
सातबारा, आठ अ, आधारकार्ड, मतदान कार्ड इत्यादी कागदपत्रे द्यावीत , अधिक माहितीसाठी
कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment