कंत्राटी शिपाई भरतीसाठी सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत
कंत्राटी शिपाई भरतीसाठी सुशिक्षीत बेरोजगारांच्या
सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत
*लातूर, दि.3 (जिमाका):* लातूर जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाकरिता 6 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती (शिपाई पदासाठी कामवाटप) करावयाची आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केले आहे आणि ज्यासंस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्ययावत आहे, अशा संस्थांनी आपले प्रस्ताव 13 डिसेंबर, 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला सादर करावेत.
आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशीरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त यांनी केलेले आहे.
प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे
संस्थेचे अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे ऑडीट रिपोर्ट. (सन 2023-24, 2022-23), सेवा सायटीच्या बँक पासबुकाची मागील 1 वर्षाची उलाढाल दर्शविणा या पानाची प्रत. (पासबुकाच्या पानाच्या प्रतिसह), सेवा सोसायटीने यापूर्वी केलेल्या शासकीय कामाचे कार्यादेश व अनुभवाची प्रपत्रे यांच्या प्रती, सेवा सोसायटी सदस्यांना ओळखपत्रे दिल्याबाबतचे व सर्व सदस्य क्रियाशील असल्याबाबतचे प्रमाणपत्रसोबत जोडावे. संस्थेने नमूद केलेली माहिती व सोबत जोडलेल्या सर्व प्रपत्रातील माहिती सत्य असल्याबाबतचे सेवा सोसायटी अध्यक्षांचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
****
Comments
Post a Comment