लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

गुरुवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूर,दि.17:-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 19 डिसेंबर,2024 रोजी सकाळी 10 वाजता लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यात रोजगार देणारे 14 पेक्षा जास्त आस्थापना, उद्योजक यांनी 410 रिक्त पदे अधिसूचित केली आहेत.

यामध्ये पुणे येथील अलाईड रिसोर्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. यांनी ट्रेनी 80 जागा (पात्रता- आयटीआय सर्व ट्रेड , डिप्लोमा दहावी, बारावी, कोणतीही पदवी). पुणे येथील तिरूमला फॅसिलिटी ट्रेनी 50 जागा (पात्रता-आयटीआय सर्व ट्रेड), छत्रपती संभाजीनगर येथील निपुण स्किल्स , निपुण मल्टीसर्व्हिसेस, ट्रेनी 50 जागा (पात्रता-आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा दहावी, बारावी, कोणतीही पदवी), व्हेरॉक इंजिनिअरिंग प्रा. लि. ट्रेनी, 50 जागा(पात्रता-दहावी, बारावी आयटीआय सर्व ट्रेड), पुणे येथील दना आनंद इंडिया, महले आनंद इंडिया, गॅब्रिएल आनंद इंडिया यांनी ट्रेनी 30 जागा (पात्रता -आयटीआय सर्व ट्रेड), नांदेड येथील चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड यांनी कस्टमर रिलेशनशिप एक्झीक्युटिव्ह-20 जागा (पात्रता- दहावी, बारावी कोणतीही पदवी), लातूर येथील इंडोमोबील सर्व्हीसेस यांनी मेकॅनिक-10 जागा (पात्रता-आयटीआय मेकॅनिक), लातूर येथील वैभव इंडस्ट्री यांनी मशिनिस्ट, फिटर,  ड्राफ्टमन, इलेक्ट्रीशन-10 जागा(पात्रता-संबंधित आयटीआय), इक्वीनॉक्स टेक्नोलॉजी यांनी टेक्नीशिअन, ऑफिसअसिस्टंट, अकाउटंट, वेल्डर-25 जागा (पात्रता-आयटीआय वेल्डर, डिप्लोमा दहावी,बारावी, कॉमर्स पदवी, टॅली), सनसुर सृष्टी इंडिया प्रा. लि. यांनी असिटंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर-30 जागा (पात्रता- बारावी, कोणतीही पदवी) सुर्योदय स्मॉल फायनांन्स बँक यांनी रिलेशनशिप ऑफिसर, कलेक्शन ऑफिसर-20 जागा (पात्रता- बारावी, कोणतीही पदवी), नांदेड येथील शिवशक्ती ऍग्रीटेक लिमिटेड यांनी सेल्स ऑफिसर-20 जागा (पात्रता-दहावी, बारावी , कोणतीही पदवी), लातूर येथील क्रेडिट ॲक्सीस ग्रामिण लि. यांनी रिलेशनशिप ऑफिसर-10 जागा (पात्रता-कोणतीही पदवी), लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी एलआसी ऍडवाझर-15जागा (पात्रता- दहावी, बारावी, कोणतीही पदवी) तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख आस्थापनांनी रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत. यासाठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आय.टी.आय. सर्वट्रेड, डिप्लोमा तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी दिनांक 19 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इ. (पाचप्रती) सह उपस्थित रहावे. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे अवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाच्या 02382- 299462 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन