एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत
शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन
लातूर, दि. 9 (जिमाका): एकत्मिक फलोत्पादन
विकास अभियांनातंर्गत सन 2024-2025 या वर्षाकरिता मनुष्यबळ विकास घटकातंर्गत राज्यामध्ये
संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरिता रक्कम रुपये
7 लाख 50 हजार रक्कमेचा कार्यक्रम मंजूर असून त्यातंर्गत तालुकानिहाय शेतकरी प्रशिक्षण
पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी विज्ञान केंद्र
देण्यात येणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत मुनष्यबळ विकास या कार्यक्रमांतग्रत शेतकरी,
क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात. फलोत्पादन पिकाचे
उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पध्दतीने अवलंब
करण्यासाठी तसेच उत्पादनांची काढणीतून व्यवस्थापन निर्यातीला चालना देणे या उद्देशाने
अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे प्रशिक्षण प्रभावी होण्यासाठी यामध्ये
प्रात्यक्षिकांचे आयोजन तसेच यशस्वी व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेटी
दिल्या जातात.
फळे व भाजीपाला रोपावाटिका, कृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती, जुन्या
फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी) , ड्रॅगन फ्रुट व जिरेनियम व
नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञान, हरितगृह व्यवस्थापन, हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट
ट्रेनिंग कोर्स, काढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला) प्रशिक्षण फलोत्पादन व अनुषंगिक
विषयावर प्रशिक्षण देण्याबाबत नियोजन आहे.
मुनष्यबळ विकास कार्यक्रम या घटकाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे रक्कम रुपये 1 हजार
प्रति प्रशिक्षणार्थी प्रती दिवस याप्रमाणे मापदंड अनुज्ञेय असून 3 ते 5 दिवसांचे निवासी
प्रशिक्षण घेण्यात येते. यामध्ये प्रशिक्षण साहित्य चहापान, भोजन व निवासी व्यवस्था
इत्यादी सुविधा आहेत. तरी प्रशिक्षणासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या
तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव
यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment