राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम समन्वयक यांना प्रशिक्षण
राष्ट्रीय
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत
वैद्यकीय
अधिकारी, कार्यक्रम समन्वयक यांना प्रशिक्षण
लातूर, दि. 17 : जिल्हा परिषद येथे जिल्हा
क्षयरोग कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभागमार्फत वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी,
वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम समन्वयक यांचे प्रशिक्षण झाले. यावेळी राष्ट्रीय क्षयरोग
दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय क्षयरोग मोहीमच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक निक्षय शपथ घेण्यात
आली.
अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी ए.जे., उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॅा.प्रदीप ढेले, आरएमओ डॅा.सारडा,
अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.बालाजी बरुरे, लातूर महानगरपालिकेचे निवासी वैद्यकीय
अधिकारी डॅा.रमेश बगडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॅा.तांबारे एस. एन., वैद्यकीय अधिकारी
डॉ. हर्षवर्धन राऊत, डॅा.अलका बांगर, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॅा.सम्यक खैरे,
तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी,
उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल
सागर यांनी उपस्थित सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना
१०० दिवस क्षयरोग मोहिमेच्या संदर्भात टीबीचा प्रादुर्भाव दर कमी करण्यासाठी प्रभावी
काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जनजागृती, निक्षय पोषण आहार, क्षयरुग्णाना लवकरात
लवकर शोधून त्याला संपूर्ण कालावधीत मोफत औषधोपचार देणे, तसेच व्यापक प्रमाणात लोकसहभाग
घेण्याच्या सूचना दिल्या. १०० दिवस मोहिमेसाठी आयोजित प्रशिक्षणामध्ये संपूर्ण मोहिमेची
सखोल माहिती, अहवाल, कर्तव्य आणि जबाबदारी, साय-टीबी तपासणी, क्षयरोग प्रतिबंध उपचार
आदीविषयी डॅा.सम्यक खैरे व डॅा. तांबारे यांनी मार्गदर्शन केले.
****
Comments
Post a Comment