दिवाळीमधील एस.टी.च्या जादा फेऱ्यातून लातूर विभागाला 2 कोटी रुपयांचे उत्पन्न
दिवाळीमधील एस.टी.च्या जादा फेऱ्यातून
लातूर विभागाला 2 कोटी रुपयांचे उत्पन्न
लातूर,दि.12:- लातूर एसटीच्या लातूर विभागाने 25 ऑक्टोबर, 2024 ते 15 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा बसस्थानकातून पुणे, सोलापूर, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परांडा, माजलगाव या मार्गावर जादा फेऱ्या चालविण्यात आल्या. या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवाशी चढ-उतार प्रवाशांना सुरक्षित सेवा दिली आहे. एस. टी. च्या लातूर विभागाला 2 कोटी 42 हजार 500 रुपयांचे उत्पन्न मिळाले .
यामध्ये लातूर आगाराने दिवाळी कालावधीत 354 जादा फेऱ्या व 82 हजार 231 कि.मी. चालवून 40 लाख 42 हजार 930 एवढे सवलतीसह उत्पन्न मिळवले आहे. उदगीर आगाराने 443 जादा फेऱ्यामधून 61 लाख 38 हजार 290 रुपये उत्पन्न मिळवले आहे.अहमदपूर आगाराने 102 जादा फेऱ्यामधून 19 लाख 3 हजार 348 रुपये एवढे सवलती सह उत्पन्न मिळवले आहे. निलंगा आगाराने 134 जादा फेऱ्यामधून 37 लाख 37 हजार 914 रुपये, औसा आगाराने 274 जादा फेऱ्यामधून 42 लाख 20 हजार 18 उत्पन्न याप्रमाणे लातूर विभागाने दिवाळी कालावधीत 1 हजार 337 जादा फेऱ्यामधून 2 कोटी 42 हजार 500 रुपये (सवलतीसह) उत्पन्न मिळविले आहे.
नोव्हेंबर या महिन्यात विभागाने 34 कोटी 51 लाख 85 हजार एवढे (सवलतीसह) उत्पन्न मिळविले आहे. यामध्ये लातूर आगाराने 96 लाख 58 हजार रुपये , उदगीर आगाराने 8 कोटी 19 लाख 24 हजार रुपये , अहमदपूर आगाराने 6 कोटी 10 लाख 28 हजार रुपये , निलंगा आगाराने 5 कोटी 61 लाख 74 हजार रुपये आणि औसा आगाराने 4 कोटी 64 लाख 1 हजार उत्पन्न मिळविले.
दिपावली जादा-2024 कालावधीत जादा फेऱ्या चालविण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, पर्यवेक्षकिय कर्मचारी, यांत्रीक कर्मचारी व चालक, वाहक यांचे लातूर विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी अभिनंदन केले आहे.
****
Comments
Post a Comment