लवाद नामतालिकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

लवाद नामतालिकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर,दि.12:- बहूराज्यीय सहकारी संस्था अधिनियम, २००२ चे कलम ८४ (४) अन्वये सन २०२५-२०२८ या कालावधीसाठी लवाद नामतालिका करण्यात येणार आहे. यासाठी पत्र व्यक्तींनी 16 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी,  प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस,  चार्टर्ड अकौंन्टंट, कॉस्ट अर्कोन्टंट , राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे),  सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे), अशा व्यक्तींना याकरिता अर्ज करता येतील.  

इच्छूक अर्जदारांवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय अथवा बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी. सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा.   अशी व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीत (Black List) मध्ये समाविष्ट नसावी. या व्यक्तीसंबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. (लातूर, उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील). व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून अर्ज दाखल करु शकते.

अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शिवाजी चौक लातूर ता. जि.लातूर यांचे कार्यालयात १७ डिसेंबर, २०२४ ते १६ जानेवारी, २०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १६ जानेवारी, २०२५ पर्यंत राहील. प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण करुन १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी प्रारुप लवाद नामतालिका प्रसिध्द होईल. प्रारुप नामतालिकेवर यादी संबंधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात लावण्यात येईल. प्रारुप नामीकेवर हरकती असल्यास vaidhanik8@gmail.com या ई-मेल वर पुराव्यासह हरकती २१ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत सादर कराव्यात. हरकतीचा निर्णय ११ मार्च,  २०२५ रोजी करुन १८ मार्च, २०२५ रोजी अंतिम लवाद नामतालिकेवर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहीर सूचना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा