७ डिसेंबर ते १७ मार्च दरम्यान जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम

 

७ डिसेंबर ते १७ मार्च दरम्यान

जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम

 

            लातूर, दि. 9 (जिमाका):   ७ डिसेंबर २०२४ ते १७ मार्च २०२५ कालावधीमध्ये क्षयरोग रुग्ण शोधमोहीम व व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिम सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर व जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमध्ये क्षयरोग शोध माहीम प्रभावीपणे राबविणे. अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये (मधुमेह, जेष्ठ व्यक्ती, कुपोषित व्यक्ती, व्यसन इत्यादी), औद्योगीक वसाहत, साखर कारखाना कर्मचारी, मजूर, वीटभट्टी, कारागृह, अनाथ आश्रम, वसतिगृह, वृध्दाश्रम इत्यादी ठिकाणी रुग्णशोध माहीम राबविणे. ‘टीबीमुक्त कार्यालय’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी गाव पातळीपासून ते जिल्हास्तरापर्यंत सूक्ष्म कृती आराखडा तयार करुन ७ डिसेंबर २०२४ ते १७ मार्च २०२५या कालावधीमध्येही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आलेले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग व लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र व वसंतराव काळे होमिओपॅथिक महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने  १० डिसेंबर २०२४ रोजी क्षयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी  वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर भारती उपस्थित राहणार आहेत. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.तांबारे एस. एन. आणि वसंतराव काळे होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.खामितकर एस.सी. यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.  

**** 




 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा