निर्यातक्षम आंबा बागांची ‘ट्रसीबालिटीनेट’वर नोंदणी करावी

 

निर्यातक्षम आंबा बागांची ‘ट्रसीबालिटीनेट’वर नोंदणी करावी   

लातूर, दि. 9 (जिमाका):  लातूर जिल्ह्यात विविध फळबाग योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंबा फळबागांची लागवड होत असून नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे आंबा फळांचे उत्पादन घेण्यात येत आहे. जागतिक बाजार पेठेतील ग्राहकांबरोबर स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षततेबाबत विशेषत: किटकनाशकांच्या उर्वरित अंशाबाबत जागरुकता निर्माण झालेली असून आंबा फळांचे उत्पादन करुन युरोपीयन व इतर देशांना निर्यात केले जाते. युरोपीय देशांनी किटकनाशके उर्वरित अंश मुक्तिची हमी अट घातल्याने सन 2004-2005 पासून जिल्ह्यात ‘अपेडा’च्या मार्गदर्शनाखाली मँगोनेट या ऑनलाईन कार्यप्रमणालीवर निर्यातक्षम आंबा बागांची मोफत नोंदणी करण्यात येत आहे.

सन 2024-25 या वर्षात 1 डिसेंबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत ट्रेसीबीलीटीनेट प्रणालवर ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यास निर्यातीस वाव मिळून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. याकरिता जिल्ह्यात कृषी विभागामार्फत गावतपातळीवर विशेष मोहीम राबवून कृषि सहाय्यक यांच्यामार्फत निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणीकरिता आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्ज घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

जिल्ह्यातील आंबा उत्पादन शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक यांच्याकडे नोंदणी अर्ज, सातबारा, आठ अ उतरा, आधारकार्ड, मतदानकार्ड इत्यादी कागदपत्रे द्यावीत, अधिक माहितीसाठी गावातील कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा. जिल्ह्यातील आंबा उत्पादन शेतकऱ्यांनी ट्रेसीबीलीटीनेट अंतर्गत नोंदणीकरिता अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी  रमेश जाधव यांनी केले आहे.

****  

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा