“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमात लातूर जिल्ह्यातील 668 ग्रंथालयांचा सहभाग
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमात
लातूर जिल्ह्यातील
668 ग्रंथालयांचा सहभाग
लातूर, दि. 26:- राज्य शासनाच्या उच्च व
तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापिठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प
महाराष्ट्राचा’ हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे.
यामध्ये लातूर जिल्ह्यातील 668 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयेही सहभागी होणार आहे.
या उपक्रमात सर्व ग्रंथसंपदेचे एकत्रित
वाचन केले जाणार असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. त्या- त्या
गावातील जेष्ठ नागरीक, महिला यांचाही सहभाग असणार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय
व लातूर जिल्ह्यातील 668 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दररोज वाचन विषयक कार्यक्रम होणार आहेत.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ निमित्त 1 ते
15 जानेवारी दरम्यान सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण
व कथा-कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार आहे. तरी या उपक्रमात जिल्ह्यातील
सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती वंदना काटकर
यांनी केले आहे.
साने गुरुजी शैक्षणिक
संकूल येथे घेण्यात येणार उपक्रम...
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन
संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम १ ते
१५ जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. लातूर येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय
व अवंती नगर येथील साने गुरुजी शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प
महाराष्ट्राचा’ अभियान राबविण्यात येणार आहे.
वाचन पंधरवाड्यानिमित्त सामूहिक वाचन, वाचन
कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
केले जाणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबविली जाणार असून
ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. लातूर शहरातील नागरिक, शाळेतील पालकांनी या उपक्रमात
सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती वंदना काटकर आणि शाळेचे मुख्याध्यापक
शेख आयाज यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment