बालगृहात दाखल सोनाली कडगंजे हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
बालगृहात दाखल सोनाली कडगंजे हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर, दि. 19 : बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सोनाली अंबादास कडगंजे (जन्म दिनांक- १० जानेवारी २०१२, वय १२ वर्षे ६ महिने) या बालिकेला १ एप्रिल २०२४ रोजी लातूर एमआयडीसी येथील मुलींचे निरीक्षणगृह तथा बाल गृहात दाखल करण्यात आले आहे. तिची उंची १४८सेमी असून तिचा चेहरा लंब गोलाकार आहे. रंग सावळा आहे व शरीराने सडपातळ आहे.
या बालिकेचे माता-पिता,पालक व इतर नातेवाईक यांनी लातूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे (मो.नं. ९८२२१३७३२७) किंवा मुलीचे निरीक्षणगृह तथा बालगृह एमआयडीसी, लातूर येथील अधीक्षक सागर मलावडे (मो.नं.९७६५०६४९१७) यांच्याशी ३० दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment