विधी संघर्षग्रस्त बालकांचे उपोषण वृत्ताबाबत खुलासा
विधी संघर्षग्रस्त बालकांचे उपोषण वृत्ताबाबत खुलासा
लातूर, दि. 19 : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचालित लातूर येथील निरिक्षण, बालगृह येथे असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकांचे उपोषण व न्याय मिळत नसल्याचा आरोप करत अन्नत्याग केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. या निरीक्षण गृहात मा. न्यायमंडळाच्या आदेशान्वये एकूण 6 विधी संघर्षग्रस्त बालके दाखल आहेत. ती बालके निरीक्षण गृहातील असलेल्या दैनंदिनीचे पालन करुन दिलेल्या वेळेनुसार नाष्टा, जेवण घेत आहेत. निरीक्षणगृह प्रशासनावर व न्याय व्यवस्थेवर त्यांचा कसलाही आरोप नाही आणि तक्रारही नाही, असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment