लातूर जिल्ह्यातील 140 शाळांमध्ये ‘परख’ सर्वेक्षण
लातूर जिल्ह्यातील 140 शाळांमध्ये ‘परख’ सर्वेक्षण
लातूर, दि. 4 (जिमाका): राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत 4 डिसेंबर 2024 रोजी देशभरात एकाच दिवशी इयत्ता तिसरी, सहावी व नववी या वर्गाच्या यादृच्छिकपणे निवडलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये परख सर्वेक्षण घेण्यात आले.लातूर जिल्ह्यातील 140 शाळांमध्ये हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 184 अन्वेषक म्हणून डी.एल.एङ विद्यालयातील छात्राध्यापक, अध्यापक व तालुका साधन व्यक्ती, विशेष तज्ञ यांनी काम पाहिले. तसेच निरीक्षक म्हणून सीबीएसई शाळेतील 131 शिक्षकांनी काम पाहिले.
जिल्ह्यामधील 3 हजार 368 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसचे 405 शिक्षकांचे प्रश्नावलीच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले. ‘परख’ सर्वेक्षणात डीएलसी जिल्हास्तर समन्वयक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी काम पाहिले. तसेच समन्वयेक म्हणून डॉ. जयपाल कांबळे, डॉ. जगन्नाथ कापसे, श्रीमती गंगा मेनकुदळे, घनश्याम पौळ, संतोष ठाकूर, डॉ. राजेश गोरे, डॉ. योगेश्वरी नाडे, निशिकांत मिरकले, गिरीश माने यांनी काम पाहिले. सर्वांच्या समन्वयाने परख सर्वेक्षण 2024 यशस्वीरित्या पार पाडले.
जिल्ह्यातील 44 शाळांतील इयत्ता तिसरीचे 1 हजार 55 विद्यार्थी तर 88 शिक्षक तसेच 46 शाळांतील इयत्ता सहावीचे 956 विद्यार्थी व 125 शिक्षक आणि इयत्ता नववीमधील 50 शाळांतील 1 हजार 357 विद्यार्थी व 192 शिक्षक असे एकूण 140 शाळांतील 3 हजार 368 विद्यार्थी व 405 शिक्षक यांनी‘परख’ सर्वेक्षणात सहभाग घेतला, असे मुरुड येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment