भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेचे
ऑनलाईन अर्ज भरण्यास
31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 18 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित
जाती व नवबौध्द घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु रिक्त जागेअभावी वसतिगृहात
प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
राबवविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा
स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सन २०२४-२५ या
शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा
लाभ घेण्यासाठी https://hmas.mahait.org हे नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले
आहे. या पोर्टलवर योजनेचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज 31 डिसेंबर २०२४ पर्यंत भरण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक
आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.
ज्युनिअर व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे नवीन
अर्ज व नुतनीकरणाचे प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या पोर्टलवर भरण्यासाठी 16 डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ
देण्यात आलेली होती. तथापि, शैक्षणिक संस्थामध्ये काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीया
अद्यापही सुरु असल्याने विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशाचा अर्ज भरण्यास अडचणी येत
आहेत. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे
अर्ज भरण्यास 31 डिसेंबर २०२४ मुदतवाढ देण्यात
आलेली आहे. तरी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी
https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्री.
चिकुर्ते यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment