लातूर येथील सैनिक मुलींच्या वसतिगृहात अशासकीय पहारेकरी पदाची भरती
लातूर येथील सैनिक मुलींच्या वसतिगृहात
अशासकीय पहारेकरी पदाची भरती
लातूर,दि.16
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थानेवरील सैनिक मुलींचे वसतिगृह लातूर
येथे निवासी अशासकीय पहारेकरी पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन रक्कम 20
हजार 886 रुपये प्रमाणे भरण्यात येणार आहे.
इच्छुक माजी सैनिक,
पत्नी, विधवा तसेच इतर नागरी विधवा महिला उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ
कागदपत्रासह मुलाखतीसाठी 24 डिसेंबर, 2024 रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय येथे स्वत: उपस्थित रहावे, व निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ
कामावर घेण्यात येणार आहे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि)
यांनी कळविले आहे.
***
Comments
Post a Comment