दिव्यांग विद्याथ्यांचे आभा क्रमांक काढण्यासाठी आयोजित विशेष शिबीराला प्रतिसाद

 दिव्यांग विद्याथ्यांचे आभा क्रमांक काढण्यासाठी

आयोजित विशेष शिबीराला प्रतिसाद


लातूर, दि. 4  (जिमाका): 
जिल्हा परिषद लातूरमार्फत जिल्हास्तरीय दिव्यांग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 3 डिसेंबर,2024 रोजी दगडोजीराव देशमुख सभागृह येथे   जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होतेत्यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांचे आभा क्रमांक काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी सर्व आरोग्य विभागाचे व आशाताई यांचे कौतुक केले. आजपर्यंत लातूर जिल्ह्यात अकरा लाख 2 हजार 665 आभा नंबर काढण्यात आलेले आहेतसेच याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी उर्वरित सर्व नागरिकांचे आभा क्रमांक काढण्याबाबत आवाहन केले. आभा खात्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबतचे डिजिटल रेकॉर्ड ठेऊ शकणार आहे. तसेच विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्याकरिता आभा खाते उपयुक्त असून ते काढणे अत्यंत सोपे आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या मोबाईलवर आपल्या स्वतःचा आभा क्रमांक काढू शकतो असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.  

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागिरा पठाण, जिल्हा सनियंत्रण  व मूल्यमापन अधिकारी मंगेश रणदिवे, डॉ. अपर्णा वाघमोडे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रतीक्षा येलडे, भातांगळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी व्यंकटेश काळे यांनी मोलाची कामगिरी बजावली .

**** 



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा