लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचे आयोजन

 लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचे आयोजन


लातूर,दि.11: राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्सहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षी दि.12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदाही लातूर जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत 12 ते 18डिसेंबर,2024 या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

12 डिसेंबर, 2024 रोजी वेळ सकाळी 11-30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा सप्ताह उद्धाटन कार्यक्रम होईल. तसेच 100 मीटर धावणे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याबाबत माहितीसाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (मो. क्र. 9975576600) व समाधान बुरगे (मो. क्र. 9552492430) यांच्याशी संपर्क साधावा. याच दिवशी सांयकाळी 5 वाजता जिल्हा क्रीडा संकुल स्केटींग रींग येथे स्केटिंग स्पर्धा होतील. याबाबत माहितीसाठी लायक सय्यद (मो. क्र. 9730630587) यांच्याशी संपर्क साधावा.

13 डिसेंबर, 2024 वेळ सांयकाळी 5 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे कराटे स्पर्धा होणार असून याबाबत सुरेखा गिरी (मो. क्र.9665294509) यांच्याशी संपर्क साधावा. याच दिवशी  सकाळी 10 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे कुस्ती स्पर्धा होणार असून यासाठी चेतन जावळे (मो. क्र. 9960159798) यांच्याशी संपर्क साधावा.

14 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे मैदानी क्रॉसकंट्री स्पर्धा होणार असून यासाठी समाधान बुरगे (मो. क्र.9552492430) व राहुल होनसांगळे                                      (मो. क्र.8010230131) यांच्याशी संपर्क साधावा. सांयकाळी 5 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे लॉन टेनिस स्पर्धा होती. या क्रीडा प्रकारासाठी मोसीन खान (मो. क्र.9881516869) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच 15 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे कबड्डी स्पर्धा होणार असून व क्रीडा प्रकारासाठी चंद्रकांत लोदगेकर (मो. क्र.9834988239) यांच्याशी संपर्क साधावा.

16 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय येथे आट्या - पाट्या या क्रीडा स्पर्धा होणार असून यासाठी श्री. कदम (मो.क्र. 7020002765) यांच्याशी संपर्क साधावा. सायंकाळी 5-00 वाजता लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे तायक्वांदो स्पर्धा होतील. यासाठी नेताजी जाधव (मो. क्र.9421443771) यांच्याशी संपर्क साधावा. याच दिवशी सकाळी 11 वाजता अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय येथे सायकलिंग स्पर्धा होतील. यासाठी शरद माने (मो. क्र.7020002765) यांच्याशी संपर्क साधावा.

17 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय अहमदपूर येथे रग्बी क्रीडा स्पर्धा होणार असून यासाठी श्री. कदम (मो. क्र.7020002765) यांच्याशी संपर्क साधावा. तर 18 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे क्रीडा सप्ताह समारोप कार्यक्रम होणार असून याबाबत क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (मो. क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 18 डिसेंबर, 2024 या कालावधीत विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धामध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (मो. क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा