लवाद नामतालिकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
लवाद नामतालिकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर,दि.31:- बहूराज्यीय सहकारी संस्था अधिनियम, २००२ चे कलम ८४ (४) अन्वये सन २०२५-२०२८ या कालावधीसाठी लवाद नामतालिका करण्यात येणार आहे. यासाठी पत्र व्यक्तींनी 16 जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस, चार्टर्ड अकौंन्टंट, कॉस्ट अर्कोन्टंट , राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे), सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे), अशा व्यक्तींना याकरिता अर्ज करता येतील. इच्छूक अर्जदारांवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय अथवा बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याह...