मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. १६ : मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्थांनी 'राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म' (एनएफडीपी) पोर्टलवर आपली नोंदणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती तेजस्विनी सिंधू प्रदीप करळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद आणि मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे. ही नोंदणी https://nfdp.dpf.gov.in किंवा https://pmmkssy.dof.gov.in या लिंकवर स्वतः किंवा जवळच्या 'सीएससी' केंद्रात जाऊन विनामूल्य करता येईल. नोंदणीसाठी ओळखपत्र आणि बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. यासोबतच, ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी https://eshram.gov.in या लिंकवर करावी. तसेच अपघात गट विमा नोंदणीबाबतची ३३ कॉलमची माहिती आणि 'केसीसी' संदर्भातील कागद...
सर्वांगीण उन्नतीवर भर महिलांचा विकास आणि बालकांचे योग्य पोषण हे उद्दिष्ट ठेवून उद्याचा उज्ज्वल भारत घडवण्यासाठी हा विभाग सतत कार्यरत आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षात नियोजनबद्ध कामही सुरू आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास आणि बालकांचा विकास साधण्यासाठी महिला आणि बालविकास विभागामार्फत सातत्याने नवनवीन उपक्रम आणि उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास महिला व बालविकास हे मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील माता-भगिनी व बालकांच्या सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे. आम्ही प्रामुख्याने आर्थिक, सामाजिक, सक्षमीकरणावर विशेष लक्ष देत आहोत. कोरोनासारख्याच्या या बिकट काळातही महिला व बालकल्याण विभाग सातत्याने कार्यरत राहून विभागाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्या माध्यमातून विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुपोषणाचे निर्मूलन हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहेत. कुपोषणाचे निर्मूलन, लसीकरण, गरोदर तसेच स्तनदा मातांचे संगोपन, बालकांचे पोषण अशा विविध पातळ्यां...
निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत लातूर, दि. 26 (जिमाका): निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे कार्यालय मागील 25 वर्षापासून शेटकार बिल्डींग पहिला मजला , दत्तानगर निलंगा येथे कार्यरत आहे. हे कार्यालय 1 एप्रिल, 2025 पासून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑप बँक लि. निलंगा (अवसायनात) शिवाजी चौक , लातूर रोड ता. निलंगा येथे स्थलांतरीत होणार आहे. तरी 1 एप्रिल 2025 पासून कार्यालयाचा पत्ता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. निलंगा द्वारा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, अर्बन को-ऑप बँक लि. निलंगा (अवसायनात) शिवाजी चौक, लातूर रोड ता. निलंगा जि. लातूर असा राहील, असे निलंगा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एन.एस. किलचे यांनी कळविले आहे. ****
Comments
Post a Comment