लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात
लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात
महालेखाकार नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय लातूरचा संयुक्त उपक्रम
लातूर, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महालेखाकार आणि लातूर जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीडीसी हॉलमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत नागपूर महालेखापाल कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी मैथिली जगन्नाथन, सहायक लेखाधिकारी चेतनकुमार गुप्ता आणि लेखापाल समिर मीना यांनी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना निवृत्ती वेतन प्रकरणे (पेंशन पेपर्स) अत्यंत अचूकपणे कसे सादर करावेत, याबाबत सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच निवृत्तीवेतनधारकांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांचे जागेवरच निराकरण केले.
या बैठकीला लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला भा. पाटील, अप्पर कोषागार अधिकारी ख.नै. खोजे, मा.रो. गुट्टे आणि ना. ए. बुध्दिवंत प्रामुख्याने उपस्थित होते. या पेन्शन अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी आर. डी. माने, स्वामी एस.एस., कुलकर्णी ए.डी., एस.व्ही. बिराजदार, ब.म.पांचाळ, अ.द.सिरसाट आणि नामदेव कोकरे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेला जिल्ह्यातील बहुसंख्येने कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी आणि निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.
***
Comments
Post a Comment