उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर;
१८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी
लातूर, दि. १८ : भारत
निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक
निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना
प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १
जून २०२६ पर्यंत असून उमेदवारी अर्जांची छाननी २ जून २०२६ रोजी केली जाईल, तसेच उमेदवारी अर्ज मागे
घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
****
Comments
Post a Comment