पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहण लातूर, दि. 15 (जिमाका) : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी लातूर येथे दाखल होतील. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार आहे. शनिवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता ते शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होईल. सकाळी 9.05 वाजता त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. यानंतर सकाळी 9.45 वाजता ते शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.सकाळी 10 वाजता विश्रामगृहात आगमन राखीव. सकाळी 10.45 वाजता ते लातूर येथील जुनी एमआयडीसीकडे प्रयाण करतील. सकाळी 11 ते 11.15 वाजता भारत डाईन येथे राखीव. त्यानंतर सकाळी 11.15 वाजता चाकूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.45 वाजता चाकूर येथील एमआयडीसी प्लॉट नं. 37 येथे आगमन व राखीव. दुपारी 12.10 वाजता चाकूर येथील नवनिर्मित शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहतील. दुपारी 1.10 वाजता पालकमंत्री लातूर येथील शासकीय विश्रामगृहात परततील. दुपारी 3 वाजता त्यांचे कातपूर रोड येथील पार्वती मंगल कार्यालय येथे आगमन व राखीव . त्यानंतर सोयीनुसार ते लातूर येथून साताराकडे येथील सुरुची निवासस्थानाकडे प्रयाण करतील. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास