केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य 'तिरंगा रॅली' चे आयोजन

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य 'तिरंगा रॅली' चे आयोजन लातूर, दि. १४ (जिमाका): स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रामार्फत सुमारे १०० मोटरसायकलींसह भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली रंगरूट प्रशिक्षण केंद्र येथून सुरू होऊन खंडापूर, गंगापूर आणि चिंचोलीराववाडी गावातून मार्गक्रमण करत उत्साहात पार पडली. रंगरूट प्रशिक्षण केंद्राचे उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अंसारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी केंद्राचे इतर राजपत्रित अधिकारी, अधीनस्थ अधिकारी तसेच जवान व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपस्थित होते. रॅली दरम्यान मार्गावरील विविध शाळा तसेच गावांमध्ये तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात आले. खंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कदम, गंगापूर येथील मुख्याध्यापक रोहन कोळी, सह्याद्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत जाधव आणि चिंचोलीराववाडी येथील हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. ए. पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास तसेच राष्ट्राप्रती नागरिकांची कर्तव्ये याबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय एकता, देशभक्ती, राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना दृढ करणे आणि विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लावणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास