पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 19 ऑगस्ट रोजी निलंगा येथे आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 19 ऑगस्ट रोजी निलंगा येथे आयोजन लातूर, दि. 14 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि निलंगा येथील शहीद चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 19 ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी १० वाजता निलंगा येथील शहीद चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून, त्यामध्ये बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.अय. डिप्लोमा (सर्व ट्रेड) तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी 19 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम (बायोडाटा) आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे. या मेळाव्याबाबत काही अडचण असल्यास उमेदवारांनी कार्यालयातील दत्तात्रय कांबळे (मो. ९०२८२३८४६५), लहू भंडारे (मो. ८०५५९९२९००) किंवा प्रविण वाघमारे (मो. ९९२२९२५८९५) यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास