अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. १४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज आणि तत्सम १२ पोटजातींमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सन २०२६ मध्ये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी २८ जुलै २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. मातंग, मांग, मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी आणि मादिगा या १२ पोटजातींमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या शिष्यवृत्तीसाठी सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेले आणि सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पात्र असतील. अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमात सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक असून, निधीच्या उपलब्धतेनुसार गुणानुक्रमे ३ ते ५ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल.
इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, सन २०२६ ची गुणपत्रिका आणि पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह दोन पासपोर्ट साईज फोटो जोडून आपले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डाल्डा फॅक्ट्री, शिवनेरी गेट समोर, लातूर येथील महामंडळाच्या कार्यालयात २८ जुलै २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
Comments
Post a Comment