मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात १४ जुलैपासून तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात १४ जुलैपासून तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन लातूर, दि. १० : राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींना स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 'तालुकास्तरीय मेळाव्यांचे' आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यांमध्ये योजनेची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. हे सर्व तालुकास्तरीय मेळावे संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती येथे सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ जुलै रोजी अहमदपूर, १५ जुलै रोजी औसा, १६ जुलै रोजी चाकूर, १७ जुलै रोजी शिरुर अनंतपाळ, २१ जुलै रोजी देवणी, २२ जुलै रोजी उदगीर, २३ जुलै रोजी जळकोट, २४ जुलै रोजी निलंगा, २७ जुलै रोजी रेणापूर आणि २८ जुलै रोजी लातूर येथील पंचायत समितीमध्ये मेळावा होईल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), पासपोर्ट साईझ फोटो आणि ग्रामीण भागासाठी लोकसंख्या प्रमाणपत्र या आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास