स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांनी ३१ जुलै पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

*वृत्त क्र. : 451* स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांनी ३१ जुलै पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ०३ (जिमाका) : केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांसाठी 'मार्जिन मनी योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी लातूर जिल्ह्यातील इच्छूक नवउद्योजक लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव ३१ जुलै २०२६ पूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. या योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना ९ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आल्या असून, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांच्या निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या नवउद्योजकांनी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून, आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत समाज कल्याण कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. अंतिम मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन