लातूर जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी खरेदीसाठी दि.17 जुलै 2026 पर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

*वृत्त क्र. : 468* *दिनांक : 10 जुलै,2026* लातूर जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी खरेदीसाठी दि.17 जुलै 2026 पर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन लातूर :- जिल्हा माहिती कार्यालय, येथील वृत्तपत्रांची व मासिकांची रद्दी विक्री करण्यात येणार आहे.यासाठी नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी आपली दरपत्रके दि. 17 जुलै 2026 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छूक रद्दी खरेदीदारांनी आपले दरपत्रके बंद लिफाफ्यात जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालयात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर 17 जुलै 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करावीत, कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. रद्दी खरेदीदाराकडे इलेक्ट्रॉनिंक वजन काटा असणे आवश्यक आहे. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयात पाहता येतील, दरपत्रकात वृत्तपत्र रद्दी, मासिके रद्दी व पेपर गोळा यांचे स्वतंत्र्य दर नमूद करावेत, रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे, तसेच संपुर्ण रद्दी विक्री प्रक्रीया रद्द करण्याचे सर्व अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील असे, लातूर जिल्हा माहिती कार्यालयायामार्फत कळविण्या‍त आले आहे ******

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास