सी.आय.एस.एफ. मध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ'ची भरती; लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

सी.आय.एस.एफ. मध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ'ची भरती; लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन लातूर, दि. ०३ : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ' या तात्पुरत्या पदांच्या भरतीसाठी पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत ए.एस.आय. (औषध विक्रेता) ची १८ पदे, ए.एस.आय. (एक्स-रे टेक्निशियन) चे १ पद आणि ए.एस.आय. (लॅब टेक्निशियन) च्या ५ पदांसह एकूण २४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या एकूण २४ पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी १५, ई.डब्लू.एस. साठी १, ओ.बी.सी. साठी ५, एस.सी. साठी २ आणि एस.टी. प्रवर्गासाठी १ पद राखीव असून, औषध विक्रेता पदांमध्ये २ जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही भरती सर्व पुरुष व महिला उमेदवारांसाठी खुली असून पात्र उमेदवारांना केवळ एकाच पदासाठी अर्ज करता येईल. लातूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ७ जुलै २०२६ रोजी रात्री २३:५९ वाजेपर्यंत सी.आय.एस.एफ. च्या https://cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे, कारण ऑनलाईन पद्धतीशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन