लातूर जिल्ह्यात १५ ते ३० जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण

लातूर जिल्ह्यात १५ ते ३० जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण लातूर, दि. १४ (जिमाका) : शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १५ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले. विशेषतः शाळाबाह्य राहणाऱ्या बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणा संदर्भाने जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सदस्य सचिव प्रमोद पवार, महिला व बालविकास अधिकारी शेख जे. एस., ‘डाएट’चे प्राचार्य मारुती सलगर उपस्थित होते. तालुकास्तर, केंद्र स्तर आणि गावस्तरावर शाळाबाह्य सर्वेक्षणाची मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांत ही मोहीम राबवून गटाची एकत्रित माहिती प्रपत्र 'अ, ब, क, ड' व त्यांचा गोषवारा विहीत नमुन्यात प्रमाणपत्रासह एक्सेल शीट' मध्ये युनिकोड (आयएसएम व्ही६) डीव्हीओटी-सुरेख एमआर फॉन्ट साईज-११ मध्ये तयार करावी. ही माहिती ई-मेलद्वारे सॉफ्ट कॉपीमध्ये आणि स्वाक्षरीसह हार्डकॉपीमध्ये ३० जुलै २०२६ पर्यंत सादर करावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सदस्य सचिव प्रमोद पवार यांनी बैठकीत सांगितले. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास