जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू; ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
वृत्त क्र. : 463
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू;
३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ९ (जिमाका) : जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या आणि ज्यांचा जन्म १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७ या दरम्यान झाला आहे, अशा पात्र विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी http://navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज मुदतीत सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment