बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिकेचे प्रकाशन प्रत्येक शनिवारी वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग - अनमोल सागर
बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिकेचे प्रकाशन प्रत्येक शनिवारी वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग - अनमोल सागर · वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांशी शिक्षक साधणार बोलीभाषेत संवाद ! लातूर , दि. २७ (जिमाका) : विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी त्यांच्या मातृभाषेतील शिक्षण उपयुक्त ठरते. आपल्या मराठीमध्ये विविध बोलीभाषा असून शाळेमध्ये शिक्षकांनी प्रमाण भाषेसोबत बोलीभाषेत संवाद साधल्यास विद्यार्थ्यांना चांगले आकलन होते. त्यामुळे जिल्ह्यातील वाडी-तांड्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी बोलीभाषेत शिक्षणासाठी विशेष वर्ग घेतले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले. मुरुड येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी श्री. सागर बोलत होते. श्रीकिशन सोम...