साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने मिळणार मोफत प्रशिक्षण
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळाच्यावतीने मिळणार मोफत प्रशिक्षण
लातूर, दि.19 (जिमाका): कौशल्य विकास व उद्योजकता विकास प्रशिक्षणा अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज आणि तत्सम जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी महामंडळाच्यावतीने तीन महिन्यांचे व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम जातीतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
किमान दहावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेतील शिक्षण घेत असलेले किंवा पदवीधारक उमेदवारांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने ३ महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी यासाठी प्रमाणपत्राच्या सत्य प्रती जोडून महामंडळाच्या लातूर कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
उमेदवारांना टेलरिंग, संगणक, ब्युटी पार्लर, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, अकाऊंट एक्झिक्युटिव्ह, सी.सी.टी.व्ही इन्स्टॉलेशन, मोबाईल रिपेअरिंग, ग्राफिक डिझाईन, ज्यूट प्रॉडक्टस स्टीचींग ऑपरेट आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी.सी.), उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्राचे सत्यप्रत दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, शिधापत्रिकेची सत्यप्रत, दोन रंगीत फोटो.
****
Comments
Post a Comment