बालविवाह मुक्त लातूरसाठी चॅम्पियन्सचे दोन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात
बालविवाह
मुक्त लातूरसाठी चॅम्पियन्सचे
दोन
दिवसीय प्रशिक्षण उत्साहात
लातूर, दि.25 (जिमाका) : जिल्ह्यात
बालविवाहाचे प्रमाण जास्त असून ते कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनमार्फत विविध
उपाययोजना करण्यात येत आहेत.
यासाठी
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर
- घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती
दलाची स्थापना करण्यात आली आहे. बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी व त्याबाबत
योग्य ते नियोजन, अंमलबजावणी व
निर्णय या कृती दलामध्ये घेण्यात येतात. त्यानुसार सक्षम
बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभाग,
युनिसेफ, एसबीसी-३ व जिल्हा प्रशासन
यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य,
पंचायत, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग मधील
तालुकास्तरीय तसेच क्लस्टरमधील अधिकारी व कर्मचारी अशा ७५ अधिकारी यांना दोन
दिवसीय बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाचे
उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख
यांनी केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एन.एस. मापारी,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे,एस.बी.सी.-३
संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक निशित कुमार, तसेच
एसबीसी ३ प्रकल्प प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक
कृपाली बिडवे,
विकास कांबळे, सिद्धाराम गायकवाड आणि
श्रुती वाघमोडे यावेळी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये
बालविवाहाची कारणे, महाराष्ट्रातील
बालविवाहांचे प्रमाण, बालविवाह निर्मूलनासाठी सुरू
असलेल्या 'सक्षम' प्रकल्पाविषयी
माहिती, बालकांचे हक्क, बालविवाह
प्रतिबंध अधिनियम २००६, बाल न्याय (मुलांची काळजी व
संरक्षण) अधिनियम २०१५, पोक्सो कायदा २०१२, विभागनिहाय नियुक्त केलेल्या ईसीएम चॅम्पियन्स यांची भूमिका व जबाबदारी,
त्यामध्ये बालविवाह निर्मूलनासाठी कार्यान्वय योजना आखून
त्याप्रमाणे नियोजन करणे, साप्ताहिक देखरेखीचे अहवाल तयार
करणे व त्यांचा नियमितपणे आढावा घेऊन कार्यालयास सादर करणे, बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यांचा
अहवाल नियमितपणे गुगल लिंक मध्ये भरणे, जिल्हा कृती
आराखड्यासाठी सर्व विभागांचे सहाय्य व नियोजन, केलेल्या
कार्यांनुसार जिल्हा कृती दल बैठकीमध्ये सादरीकरण अहवाल तयार करणे इत्यादी
गोष्टींची माहिती व मार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये करण्यात आले.
या
दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी बालविवाह निर्मुलन जिल्हा कृतीदल सदस्य
सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्गदर्शनाने प्रमुख प्रशिक्षक म्हणून
एसबीसी-३ संस्थापक निशित कुमार, प्रकल्प प्रमुख नंदू जाधव,
वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बिडये यांनी उपस्थित अधिकारी व
कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमासाठी
एसबीसी-३ वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे आणि सिध्दाराम गायकवाड,
प्रकल्प समन्वयक श्रुती वाघमोडे, कम्युनिकेशन
समन्वयक रूचिका अहिरे यांनी प्रशिक्षण यशस्वितेसाठी प्रयत्न
केले.
****
Comments
Post a Comment