‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत नेहरु युवा केंद्रामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन

 

‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत नेहरु युवा केंद्रामार्फत

विविध उपक्रमांचे आयोजन

 

लातूर, दि.26 (जिमाका) : स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४  दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छता शप , नुक्कड नाटक , स्वच्छता रॅली, वाल रायटिंग, स्वच्छता अभियान संपूर्ण लातूर जिल्ह्यात राबविले जात आहे.

२५ सप्टेंबर, २०२४ रोजी लातूर नेहरू युवा केंद्र व दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क व गांधी चौकात स्वच्छता अभियान राबविले गेले. तसेच चाकूर व रेणापूर तालुक्यामध्ये वॉल रायटिंगच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली. त्याच बरोबर लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये स्वच्छता जनजागृती व शपथ देण्यात आली.

२६ सप्टेंबर, २०२४ रोजी नेहरू युवा केंद्र व दयानंद कला महाविद्यालय यांच्यावतीने दयानंद महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत स्वच्छता  जनजागृती रॅली काढण्यात आली. त्या कार्यक्रमात माय भारत स्वयंसेवक , एनएसएस, एनसीसी, व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात कला महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गायकवाड, जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैय्या, उप प्राचार्य दिलीप नागरगोजे , प्रा. गोपाळ बाहेती , प्रा. जगताप,प्रियंका मोरे, प्रशांत साबणे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

**** 




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु