निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; तेरणा नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

 निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; तेरणा नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन


लातूर, दि. २४ : माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पात येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे ४ वक्रद्वारे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून निम्न तेरणा नदीपात्रात  १५२६ क्यूसेक्स  (४३.२२६ क्युमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्यामुळे प्रकल्पाखालील तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निम्न तेरणा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु