प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील १८ कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील १८ कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन


• 18 महाविद्यालयांमध्ये सुरु होणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

 लातूर, दि. १८ : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. याअनुषंगाने १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना राज्य शासनाने सुरु केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० सप्टेंबर रोजी वर्धा येथून या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ होणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांमधील कौशल्य केंद्रांचा समावेश आहे.

प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे राज्यात प्रतिवर्षी साधारण दीड लाख युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक-युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

१) लातूर येथील ब्रीलीयंट महाविद्यालय, २) महिला बीसीए महाविद्यालय, ३) जयक्रांती आर्टस् अँड कॉमर्स सिनियर कॉलेज, ४) कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी (कॉक्सिट), ५) एम.एस.बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, ६) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स, एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज अँड वाय.सी.आर. हॉस्पिटल कॅम्पस, ७) कन्हेरी येथील मांजरा महाविद्यालय, ८) मुरुड येथील संभाजी कॉलेज, ९) चाकूर येथील डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी, १०) हाडोळती येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, ११) चापोली येथील संजीवनी महाविद्यालय, १२) उदगीर येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ, १३) शिवाजी महाविद्यालय, १४) श्री हावगी स्वामी कॉलेज, १५) निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय, १६) अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय, १७) जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय आणि १८ ) शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयात सुरु होणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन यावेळी केले जाणार आहे.
***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु