साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनांसाठी आज लॉटरी पद्धतीने होणार लाभार्थी निवड

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

योजनांसाठी आज लॉटरी पद्धतीने होणार लाभार्थी निवड

लातूरदि. ०५ (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फतसन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी शुक्रवारी (दि. ०६) सकाळी ११ वाजता लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड  होणार आहे.

पाच लाख रुपये असलेली प्रकल्प मर्यादा सुविधा कर्ज योजनेअंतर्गत ७० लाभार्थीचे उद्दिष्ट आणि १ लाख ४० हजार प्रकल्प मर्यादा असलेल्या महिला समृध्दी योजनेअंतर्गत ५० लाभार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनांसाठी ७ फेब्रुवारी ते २० मार्च २०२४ या कालावधीत कर्ज मागणी अर्ज मागविण्यात आले होते. सुविधा कर्ज योजनेअंतर्गत ४६७ अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी ४४५ पात्र व २२ अपात्र आहेत. महिला समृध्दी योजनेअंतर्गत ८२ अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी ७७ पात्र व ५ अपात्र आहेतअसे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु