धर्मदाय रुग्णालय आणि महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत रुग्णालयांमार्फत ग्रामीण भागात विनामुल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

 धर्मदाय रुग्णालय आणि महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत

रुग्णालयांमार्फत ग्रामीण भागात विनामुल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

लातूरदि. ०५ (जिमाका): जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालय आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमार्फत जिल्ह्यात सप्टेंबर, 2024 व ऑक्टोबर, 2024 मध्ये शासनाच्या धोरणानुसार सामुदायिक आरोग्य शिबिरे विनामुल्य राबविण्यात येत आहेत.

सप्टेंबर, 2024 रोजी लातूर शहरातील विवेकानंद हॉस्पिटलच्यावतीने लातूर तालुक्यातील काटगाव येथे, नेत्र प्रतिष्ठानच्यावतीने औसा तालुक्यातील नागरसोगा येथे, लातूर येथील सदासुख हॉस्पिटलच्यावतीने मातोळा येथेलातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलच्यावतीने लोदगा येथे सामुदायिक आरोग्य शिबीर होईल.

8 सप्टेंबर 2024 रोजी लातूर शहरातील भटड हॉस्पिटल आणि सह्याद्री मल्टीस्पेशालिटीच्यावतीने औसा तालुक्यातील बेलकुंदा येथे शिबीर होईल. 9 सप्टेंबर 2024 रोजी एमआयटी हॉस्पिटलच्यावतीने लातूर तालुक्यातील जवळा, विवेकानंद हॉस्पिटलच्यावतीने लातूर तालुक्यातील कामखेडा येथे शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

10 सप्टेंबर 2024 रोजी उदयगिरी लॉयन्स हॉस्पिटलच्यावतीने निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे, एमआयटी हॉस्पिटलच्यावतीने निलंगा तालुक्यातील गातेगाव येथे, अल्फा सुपर स्पेशालिटीच्यावतीनेऔसा तालुक्यातील लिंबाळा येथे, 11 सप्टेंबर 2024 रोजी उदयगिरी लायन्स हॉस्पिटलच्यावतीने निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे, देशपांडे हॉस्पिटलच्यावतीने अंबुलगा यथे, सह्याद्री मल्टीस्पेशालिटीच्यावतीने नागरसोगा येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

12 सप्टेंबर रोजी उदयगिरी लायन्स हॉस्पिटलच्यावतीने उदगीर येथे, एमआयटी हॉस्पिटलच्यावतीने लातूर तालुक्यातील सामनगाव येथे, आयकॉन हॉस्पिटलच्यावतीने औसा तालुक्यातील फत्तेपूर येथे आरोग्य शिबीर होईल. 13 सप्टेंबर रोजी भटड हॉस्पिटलच्यावतीने औसा तालुक्यातील नागरसोगा येथे, नेत्र हॉस्पिटलच्यावतीने औसा तालुक्यातील वानवाडा येथे आरोग्य तपासणी होईल.

14 सप्टेंबर रोजी उदयगिरी लायन्स हॉस्पिटलच्यावतीने निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, एमआयटी हॉस्पिटलच्यावतीने लातूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे, नेत्र हॉस्पिटलच्यावतीने औसा तालुक्यातील बोरफळ येथे, सह्याद्री मल्टीस्पेशालिटीच्यावतीने तांबरवाडी येथे आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

15 सप्टेंबर रोजी भटड हॉस्पिटलच्यावतीने बोरफळ येथे, एललाले हॉस्पिटलच्यावतीने टेंभी येथे, गायत्री हॉस्पिटलच्यावतीने बुधोडा येथे आणि कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने लामजना येथे, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने बोरफळ येथे आणि विवेकानंद हॉस्पिटलच्यावतीने उबुरगा येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाईल, असे लातूरचे धर्मादाय उपायुक्त यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा