जिल्हा क्रीडा संकुल येथे 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबीर

                                                    जिल्हा क्रीडा संकुल येथे 1 ऑक्टोबर रोजी

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबीर

लातूर, दि.26 (जिमाका) :  दरवर्षी 01 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या दिनाचे औचित्य साधून 1 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रिडा संकुल, लातूर येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर व सह्याद्री हॉस्पिटल, लातूर यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मार्केट यार्ड, शिवनेरी गेटसमोर, डाल्डा फॅक्टरी कंपाऊंड, लातूर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभाग जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी.आर.पाटील, जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.बी. जोशी, लातूर जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश धादगिने व ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी लातूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबीरास व मुख्य कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे  समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ लातूर शाखा यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु