क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
लातूर, दि. 6 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शनिवार, 7 सप्टेंबर, 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांचे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6-25 वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल. दुपारी 1 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता उदगीर येथील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे आयोजित श्री. अर्जूनराव लालू गोडबोले, मुख्याध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा व कु. यश व कु. स्वंयम यांचा वाढदिवस सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर उदगीर येथे राखीव.
सायंकाळी 7-15 वाजता युवक संघ गणेश मंडळ पारकट्टी गल्ली , 2024 उदगीरच्यावतीने मानाचा पहिला आजोबा गणपती मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थिती. सांयकाळी 7-30 वाजता मुक्कावार चौक उदगीर येथील श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ उदगीर सार्वजनिक गणेशोत्सव -2024 च्या श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थिती. रात्री 8 वाजता उदगीर तालुक्यातील हमालवाडी येथील रक्षाधीश गणेश मित्र मंडळ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास व श्री च्या आरतीस उपस्थिती. रात्री 9 वाजता उदगीर शहरातील पत्तेवार चौक येथील संघर्ष मित्र मंडळ व श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळ गणेशोत्सव -2024 च्या ममर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास व श्री च्या आरतीस उपस्थिती. सोईनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण .
Comments
Post a Comment