लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने 20 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन :


लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने 20 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन :


लातूर, दि. 18 : अभियंता दिन आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ,बांधकाम  भवन येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते 2.0 पर्यंत  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होत आहे.


सार्वजनिक बांधकाम तसेच सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी विभाग, त्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा. इच्छूक रक्तदात्यांनी आपली नावे उप अभियंता संजय सावंत आणि राजेंद्र बिराजदार यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता डी. बी. निळकंठ, एम. एम. पाटील, गणेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा