संवाद व संबोधन कार्यक्रम आनंद सोहळा होतो तेंव्हा... उखाणेस्पर्धा, पैठणी वाटप, रांगोळी आणि नवी उमेद      

संवाद व संबोधन कार्यक्रम आनंद सोहळा होतो तेंव्हा... उखाणेस्पर्धा, पैठणी वाटप, रांगोळी आणि नवी उमेद              उदगीर, (लातूर)दि. 04 सप्टेंबर:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनात कायऐकायला मिळणार ! मुख्यमंत्री अर्थात लाडक्या बहिणींचा भाऊ नवीन कायसंदेश देणार... तर देवेंद्र फडणवीस नवीन काय बोलणार अशा सर्व उत्सुकतांना घेऊन जिल्हाभरातीलमहिलांच्या उदगीर येथील हजारोंचा समुदाय आज सेलीब्रेशन मूडमध्ये होता. त्यामुळे पोस्टर,बॅनर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी हस्तांदोलन तर कुठे रक्षा बंधन असा एकूणच आनंददायीमाहौल उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर होता. त्यामुळे संवादसंबोधनाचा कार्यक्रम आनंद सोहळा झाला होता. या आजच्या कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनासाठी विविध स्पर्धांचेआयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, विविधांगी घोषवाक्य प्रत्येकाचावेगळा ड्रेसकोड आणि महाराष्ट्राच्या वैभवाची सुरेल संगीत मैफील यामुळे आनंद मेळावाआणखी मजेदार झाला.   या कार्यक्रमालाजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला सरपंच पिवळ्या रंगाचे फेटे परिधान करून आल्या होत्या.त्यांच्या हाती राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीतसेच मंत्री महोदयांचे छायाचित्र असलेले फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या फलकांवरविशेषत्वाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्रीयुवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्रीवयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भरअसलेल्या योजनांच्या फलकांचा समावेश होता. आकर्षक व्यासपीठराष्ट्रपती श्रीमतीद्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या स्वागतासाठी शहरातीलप्रमुख मार्गावर आकर्षक कमानी उभारण्यात आल्या होत्या. सोबतच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्याप्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी मुख्य व्यासपीठ विविध रंगीबेरंगी पुष्पगुच्छांनीसजविण्यात आले होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांची आणि विशेषत्वाने देशाला महाराष्ट्राची महिला सशक्तीकरणाच्या योगदानातून नवी ओळखदेणाऱ्या रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक राजमाताअहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. तसेच व्यासपीठासमोरीलजागेत कृषि विभागाच्यावतीने काढण्यात आलेली बाजरा, भगर आदी विविध धान्यापासून रांगोळीकाढून मिलेट वर्ष साजरे करताना नागरिकांनी आपल्या आहारात कडधान्याचा वापर करण्याचा'मिलेट हट'च्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता. आशयपूर्णरांगोळ्यासाधारणत: रांगोळीहा कलात्मक प्रकार त्यातील रंग छटा आणि रेखाचित्रांवर असते. मात्र, आज आनंद मेळाव्यातकाढण्यात आलेली रांगोळी आशयघन होती. रांगोळीला काही बोलायचे होते, मुख्यमंत्री लाडकीबहीण योजना व तृणधान्यांचा वापर याचा संदेश या रांगोळीतून दिला जात होता.   शहरात मान्यवरांचेआकर्षक कटआऊट्सआजच्या कार्यक्रमासाठीऐतिहासिक नगरी उदगीर शहरात येणाऱ्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरणमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडाव युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरेयांचे लक्षवेधक कटआऊट्स शहरात तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.मुख्य कार्यक्रमाच्यासुरुवातीला प्रा. संदीपान जगदाळे व सहकारी लातूर, जल्लोष ग्रूप नागपूर आणि येडवे वबिदरकर गुरुजी, सोलापूर यांच्या चमूने उपस्थितांसमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेसादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या स्थळी राज्य शासनाच्या कृषी विभाग, रोजगारउद्योजकता व कौशल्य विकास विभाग, समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग, मत्स्यव्यवसायविभाग, जिल्हा आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांचीमाहिती देण्यात आली होती.  ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु