बालगृहात दाखल मुलीच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर, दि. १९ : बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्रिशाला सुनील बनसोडे (जन्म दिनांक- १० मार्च २००८, वय १६ वर्षे ३ महिने) हिला १६ फेब्रुवारी २०२२ रोजी लातूर एमआयडीसी येथील स्वयंसिद्ध महिला मंडळ संचलित गोकुळ बालगृह येथे दाखल करण्यात आले आहे. तिची उंची १५९ सेमी असून डाव्या बाजूच्या गालावर तीळ आहे. तिचा चेहरा लंब गोलाकार असून रंग सावळा आहे. शरीराने सडपातळ आहे. तिच्या माता-पिता,पालक व इतर नातेवाईक यांनी धमानंद कांबळे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), लातूर मो.नं.: ९८२२१३७३२७ किंवा वैशाली कुलकर्णी (अधीक्षक, स्वयंसिध्द महिला मंडळ संचलित गोकुळ बालगृह एम.आय.डी.सी,लातूर) मो.नं. ८३९०९०६७२३ यांच्याशी ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment