व्यावसायिक महाविद्यायात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
व्यावसायिक महाविद्यायात प्रवेशित विद्यार्थ्यांना
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 10 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 मुलींचे 12 असे एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृह प्रवेशासाठी तसेच रिक्त जागेअभावी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2024-2025 पासून https://hmas.mahait.org हे नविन बेव पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
या नवीन पोर्टल लिंकचा वापर करुन व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रक, प्रवेशासाठी नियम, अटी वशर्ती यांची माहिती घेवून अर्ज भरु शकतात. शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात व्यावसायिक पदवी, पदविका प्रथम वर्षात, पदव्युत्तर प्रथम वर्षात तसेच थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 16 सप्टेंबर, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेब पोर्टलवद्वारे अर्ज भरलेल्या परंतु, रिक्त जागेअभावी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेलया उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
तेंव्हा शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेब पोर्टल वापर करुन तसेच स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment